नवी दिल्ली – गुजरातमधील मुंद्रा बंदरावर काही दिवसांपूर्वी हेरॉईन या अंमली पदार्थाचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला. त्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे.
अफगाणिस्तानातून इराणमार्गे पाठवण्यात आलेल्या सुमारे 3 हजार किलो हेरॉईनचा साठा मुंद्रा बंदरावर ताब्यात घेण्यात आला. त्या साठ्याची किंमत तब्बल 21 हजार कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते. त्या हेरॉईन साठा जप्तीचे राजकीय पडसादही उमटत आहेत.
त्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून आणि प्रामुख्याने कॉंग्रेसकडून केली जात आहे. आता संबंधित प्रकरणाचा तपास एनआयएने हाती घेतला आहे. तपासाला गती देण्याच्या उद्देशातून एनआयएने गुन्हाही दाखल केला आहे.