पुणे- करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात आता आटोक्यात आले आहेत. मात्र, मागील आठवड्यात ग्रामीणमध्ये रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाल्याचे दिसून येते. ग्रामीणमध्ये नव्याने तीन म्युकरमायकोसिसचे रुग्ण सापडले आहेत.
सध्या पुण्यात 50, पिंपरी-चिंचवडमध्ये 3, ग्रामीण भागात 11, तर ससून रुग्णालयात 95 अशा 162 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पुण्यात 422, पिंपरी-चिंचवडमध्ये 263, ग्रामीण भागात 77 आणि ससून रुग्णालयात 349 अशा 1 हजार 111 रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडले आहे. शहरासह जिल्ह्यात 217 म्हणजेच आठवड्यात दोन जणांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.