कर्जत – कर्जत तालुक्यातील सिद्धटेक- दुधोडी रस्त्याने जात असताना बबन मगर यांना आबासाहेब आप्पाजी भोसले यांच्या शेतातील ऊस पेटलेला दिसला.
शॉर्टसर्किटने हा ऊस पेटल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ सिद्धटेक-बेर्डीचे उपसरपंच हनुमंत भोसले यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर हनुमंत भोसले यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईनवरून ही माहिती कळवली आणि काही वेळातच घटनास्थळी पोलीस पाटील दादासाहेब भोसले व 150 ते 200 गावकरी घटनास्थळी मदतीसाठी धावले.
काही मिनिटांमध्ये गावकऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली. त्यामुळे 10 गुंठे क्षेत्र वगळता उर्वरित 50 ते 60 एकर क्षेत्रातील ऊसाचे लाखो रुपयांचे नुकसान टळले.