पुणे- शहरात रविवारी दिवसभरात करोनाचे नवे 151 बाधित आढळले. तर, 169 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 6 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील तीन पुण्यातील आणि तीन बाधित पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत 9 हजार 36 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सध्या 1 हजार 519 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 214 जणांची प्रकृती गंभीर असून, अन्य 188 जण ऑक्सिजनवर आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढली असून, ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात 6 हजार 564 संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत 33 लाख 90 हजार 305 संशयितांच्या स्वॅबटेस्ट झाल्या असून, त्यात 5 लाख 1 हजार 503 बाधित आढळले आहेत. त्यातील 4 लाख 90 हजार 948 बाधित बरे झाले आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.