दुबई – आयपीएलमध्ये सातत्याने अपयशी ठरत असलेल्या सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला अखेर संघातून डच्चू दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता वॉर्नर पुढील आयपीएल स्पर्धेत लिलावासाठी उपलब्ध होणार असून, यंदाच्या स्पर्धेतील उर्वरित सामन्यातही तो हैदराबाद संघाकडून खेळताना दिसणार नसल्याचेही सांगितले जात आहे.