दुबई – सलामीवीर आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला वगळण्याचा मोठा फटका पंजाब किंग्ज संघाला बसला. आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील राजस्थानविरुद्धच्या मंगळवारी झालेल्या लढतीत पंजाबला केवळ 2 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले.
या सामन्यात अखेरच्या षटकांत पंजाबला चार धावांची गरज होती. कार्तिक त्यागीने अफलातून गोलंदाजी करत या षटकात दोन गडी बाद केले व राजस्थानला नाट्यमय विजय मिळवून दिला.
या सामन्यात गेलसारख्या टी-20 च्या स्पेशालिस्ट खेळाडूला संघातून वगळून एडन मार्करमला संधी दिली गेली हीच मोठी चूक पंजाबला भोवली, असेही गावसकर म्हणाले.
गेलला त्याच्या वाढदिवशीच झालेल्या या सामन्यात न खेळवण्याच्या निर्णयाबद्दल मला आश्चर्य वाटले, असेही गावसकर म्हणाले.