#IPL2021 : संजू सॅमसनला तब्बल 12 लाखांचा दंड

दुबई : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला पंजाबविरुद्धच्या सामन्यात संघाच्या गोलंदाजांनी वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल तब्बल 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

आयपीएलच्या नियमानुसार 90 मिनिटात 20 षटके पूर्ण करावी लागतात. यामध्ये दोन स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा समावेश असतो. या मोसमात राजस्थानकडून घडलेली ही पहिली चूक आहे. जर असे पुन्हा घडले तर हा दंड दुप्पट होणार आहे.

तसेच संघाचा कर्णधार सॅमसन याच्यावर एका सामन्याची बंदीही लावली जाऊ शकते व त्याला तब्बल 30 लाख रुपयांचा दंडही होऊ शकतो. वेळेत षटके पूर्ण होतात की नाही ते पाहण्याची जबाबदारी केवळ कर्णधाराची नसते त्यामुळे संपूर्ण संघाला दंड होऊ शकतो.

राजस्थान रॉयल्सकडून पुन्हा अशी चूक झाली तर संघातील प्रत्येक खेळाडूला 6 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. जर ही चूक तिसऱ्यांदा केली तर त्याना रकमेच्या 50 टक्के म्हणजेच 12 लाखांचा दंड केला जाऊ शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.