पॅरिस – ऑस्ट्रेलियाने स्वतःचा आण्विक क्षमता असलेली पाणबुडी विकसित करण्यासाठी अमेरिकेबरोबर करार केल्यानंतर फ्रान्सने अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील राजदूत माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रलियाने पाणबुडी फ्रान्सबरोबरचा करार रद्द करून अमेरिकेबरोबर करार केल्यामुळे नाराज झालेल्या फ्रान्सने या देशातूल राजदूतांना चर्चेसाठी माघारी बोलावले आहे.
या प्रकरणाचा गांभर्य लक्षात घेऊन अध्यक्षांच्या सल्ल्याने अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील राजदूतांना माघारी बोलावण्यात आले आहे, असे युरोपालाठीचा परराष्ट्र मंत्री जीन येव्ह ली ड्रीयन यांनी सांगितले. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासाठी फ्रान्सने अशाप्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेतला आहे, असे चीनी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया-अमेरिका आणि ब्रिटनने चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठ “ऑकस’ नावाचा त्रिपक्षीय गट स्थापन केला असून या गटाच्या पहिल्या बैठकीमध्येच ऑस्ट्रेलियासाठीच्या आण्विक पाणबुडीविषयी करार करण्यात आला आहे. अमेरिका आणि ब्रिटनकडून पाणबुडीविषयीचे तंत्रज्ञान घेऊन ऑस्ट्रेलिया स्वतःचा आण्विक पाणबुडी विकसित करणार आहे.