छोट्या पडद्यावरील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अर्शी खान आता मोठ्या पडद्यावर धम्माल करणार आहे. अर्शी खान ही “त्राहिमाम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटाबाबत अर्शी खान खूपच उत्साहित आहे.
ती म्हणजे आहे की, माझे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. अर्शी खान म्हणाली, बॉलीवूडमध्ये काम करण्याचे माझे स्वप्न होते आणि आता ते खरे होत असल्यामुळे मी थोडीसी नर्व्हस आहे. मला विश्वास बसत नाही ही ते सत्यात उतरत आहे. या गोष्टीचा विचार करून मी खूपच भावुक होउन जाते. यासाठी मी धन्य आणि उत्साहित असल्याचे तिने सांगितले. अर्शी खानच्या डेब्यू चित्रपटाचे दिग्दर्शन दुष्यंत प्रताप सिंहने केले आहे.
या चित्रपटात पंकज बेरी, राजू खेर आणि आदी ईराणी यासारख्या दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील आपल्या भूमिकेसंदर्भात अर्शी म्हणाली, या चित्रपटात मी चाहत्यांना खूपच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
यात मी चंपा नामक एका गावातील मुलीची भूमिका साकारत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास “विश’, “इश्क मेंमरजावां’ आणि “सावित्री देवी कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल’ यासारख्या टीव्ही शोमध्ये दमदार भूमिका साकारली आहे. तसेच “बिग बॉस-14’मध्येही ती सहभागी झाली होती.