पुणे – सहकारनगर पोलिसांनी सापळा रचून एका दुचाकी चोरास जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. शुभम विलास भगत ( 20 रा. सावरकर चौकाजवळ जिजाबा चाळ धनकवडी ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
सहकार नगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या आदेशाने तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व स्टाफ हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना एक खबर मिळाली होती.
त्यानूसार भगत हा चोरीची मोटर सायकल विक्री करण्यासाठी धनकवडी स्मशानभूमी च्या पाठीमागील गेटजवळ येणार होता. त्यानूसार सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस निरीक्षक युनुस मुलाणी, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापू खुटवड, पोलीस नाईक भुजंग इंगळे , सुशांत फरांदे , महादेव नाळे पोलीस शिपाई महेश मंडलिक , सागर सुटकर , सागर शिंदे , शिवलाल शिंदे व प्रदीप बेडिस्कर यांच्या पथकाने केली आहे.