नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये रजतपदक जिंकल्यावर भारताचा रवी दहिया जागतिक स्पर्धेत कशी कामगिरी करतो याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, रवी दहियाने पुरेसा सराव मिळाला नसल्यामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुढील महिन्यात भारतीय कुस्ती महासंघाकडून निवड चाचणी घेतली जाणार आहे. मात्र, टोकियोवरून मायदेशी परतल्यापासून सरावाला फारसा वेळ मिळालेला नाही.
ही स्पर्धा नॉर्वे येथे येत्या 2 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. मॅटवरची कुस्ती खेळण्यासाठी खूप सराव आवश्यक असतो. मात्र, तोच मिळाला नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे दहियाने सांगितले.