नवी दिल्ली – भारतीय लष्करात सेवा योग्यतेनुसार २६ वर्ष पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांचे कर्नल रँकवर प्रमोशन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोअर ऑफ सिग्नल, कोअर ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड मॅकेनिकल इंजिनिअर आणि कोअर ऑफ इंजिनिअर्समध्ये नियुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँक मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
याआधी आर्मी मेडिकल कोअर, जज अॅडवोकेट जनरल आणि सैन्य प्रशिक्षण कोअर याच विभागातील महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँकपर्यंत प्रमोशन दिलं जात होतं.भारतीय लष्करात विविध विभागांमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या प्रमोशनचा मार्ग खुला होणं हे लष्करी क्षेत्रातील करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी मोठ्या संधीचे संकेत आहेत.
भारतीय लष्कराच्या बहुतांश विभागांमध्ये महिला अधिकाऱ्यांना स्थायी स्वरुपात हुद्दा होण्याच्या निर्णयासोबतच आणखी काही महत्वाचे निर्णय येत्या काळात घेतले जाऊ शकतात.
या आहेत पाच महिला अधिकारी
कोअर ऑफ सिग्नलच्या लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना
ईएमई कोअरच्या लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंदआणि कर्नल नवनीत दुग्गल.
कोअर ऑफ इंजिनिअर्सच्या लेफ्टनंट कर्नल रीनू खन्ना व कर्नल रिचा सागर यांचा समावेश
भारतीय लष्कराच्या विविध शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीचे मार्ग वाढवून लष्करात त्यांच्यासाठी करिअरच्या संधी वाढण्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे.
भारतीय लष्कराच्या बहुसंख्य शाखांमधून महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा निर्णय येत्या काळात भारतीय लष्करात लैंगिक समानतेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा ठरेल.