पुणे – करोनावरील लसीचा अपुरा पुरवठा आणि पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी करावी लागणारी प्रतीक्षा या कारणांमुळे करोनावरील लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्राधान्याने लसीचा दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या निर्णयामुळे पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील नागरिकांना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.