नगर -नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बिबट्याचा वावर आहे. या भागातील तीन मेंढ्या, कुत्री यांच्या बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेऊरमधील चापेवाडी शिवारातील खंडोबा माळ परिसरात भिवा घुले हे आपल्या मेंढ्यासह पाल ठोकून राहत होते. सोमवारी रात्री बिबट्या मेंढ्याच्या कळपात घुसला. त्यात दोन मेंढ्याचा मृत्यू झाला. मेंढयांचा ओरडण्याचा आवाज आल्याने ते जागी झाल्याने त्यांना बिबट्या दिसला.
त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले. त्यानंतर पुन्हा पहाटेच्या वेळी बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला केला. त्यात एक मेंढी, कुत्र्याची शिकार बिबट्याने केली. त्यामुळे या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.