पुणे (प्रतिनिधी) – लोखंडी पत्रा बनविण्यासाठी कच्चा माल पुरविण्याच्या आमिषाने कंपनीने तरूणाची १८ लाख ३० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ कालावधीत वडगाव बु्रदूकमधील स्पेस मॅग्नम इक्युुमेंट प्रायव्हेट लिमीटेड कंपनीत घडली.
याप्रकरणी मेटल्स प्रायव्हेट लिमीटेड स्टील प्रोसेसर कंपनीच्या संचालकांविरूद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज सोलापूरे (वय ४४, रा. चव्हाणनगर ) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज यांची पत्रा बनविण्याची कंपनी आहे. १८ फेब्रुवारीला त्यांचे मेटल्स प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या एकासोबत बोलणे झाले होते. त्यावेळी संबंधित कंपनीच्या संचालकांनी मनोज यांच्या कंपनीला पत्रा बनविण्यासाठी कच्चा माल पुरविण्याचे आमिष दाखविले.
त्यासाठी आरोपींनी मनोज यांच्याकडून १८ लाख २७ हजार रूपये घेतले. मात्र, रक्कम घेउनही पत्रा बनविण्याचा कच्चा माल न पुरविल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. धोत्रे तपास करीत आहेत.