नवी दिल्ली – जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याच्या भाव वधारताना दिसत आहे.
गुरुवारी (दि. 12) सकाळी सोन्याचा भाव वाढून 46, 394 च्या स्तरापर्यंत पोहोचला. यापूर्वी सोन्याचा भाव 45, 800 रुपये इतका होता.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात 156 रुपयांची घसरण झाली असून, आज चांदीचा प्रतिकिलो भाव 62, 615 रुपये इतका झाला आहे.
यापूर्वी मंगळवारी (दि. 10) सराफ बाजारात सोने 176 रुपयांनी कमी होऊन 45,110 रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले होते. तर दुरीकडे तयार चांदीचा दर 1, 128 रुपयांनी कमी होऊन 62, 572 रुपये प्रति किलो झाला होता.