पुणे – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामार्फत (आयसीएआय) घेण्यात येणारी “सीए’च्या वेगवेगळ्या कोर्सच्या परीक्षा 5 ते 19 डिसेंबरदरम्यान होणार आहेत. विद्यार्थ्यांना जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देता येणार असून, सीए फाउंडेशन, इंटरमीडिजिएट आणि अंतिम या तीनही परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
“सीए’ फाउंडेशन परीक्षा आता नव्या अभ्यासक्रमानुसार होणार असून, ती 13 ते 19 डिसेंबरदरम्यान होणार आहे. “ग्रुप’ एकचे पेपर 6 ते 12 डिसेंबर, दोन 14 ते 18 डिसेंबरदरम्यान होणार आहे. सीएची अंतिम परीक्षाही जुन्या आणि नव्या अशा दोन अभ्यासक्रमांनुसार होतील. सीएच्या अंतिमच्या ग्रुप एकची परीक्षा 5 ते 11 डिसेंबरदरम्यान होणार आहे. तर, “ग्रुप’ दोनची परीक्षा 13 ते 19 डिसेंबरदरम्यान होणार आहे. “सीए’ म्हणून मान्यता मिळालेल्या प्रोफेशनल्ससाठीही तीन परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत.
इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, इंटरनॅशनल ट्रेड लॉ अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनल टॅक्सेशन ऍसेसमेंट टेस्ट या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षाही डिसेंबर महिन्यात होत आहे.