श्रीहरीकोटा – श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपणस्थळावरून भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या, म्हणजेच इस्रोच्या ( GISAT-1 ) जीएसएलव्ही- एफ १० या उपग्रहाचे आज सकाळी ५:४५ च्या सुमारास प्रक्षेपण करण्यात आले. मात्र इस्रोची उपग्रह प्रक्षेपण मोहीम अयशस्वी ठरली आहे.
GSLV-F10 lifts off successfully from Satish Dhawan Space Centre, Sriharikota#GSLV-F10 #EOS03 #ISRO pic.twitter.com/iXZfHd7YdZ
— ISRO (@isro) August 12, 2021
नासा स्पेस फ्लाइट डॉट कॉमच्या ख्रिस बर्गिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहितीनुसार, प्रक्षेपकाचे पहिले दोन टप्पे यशस्वी पार पडले. जीएसएलव्ही- एफ १० ने नियोजित वेळेत ईओएस-०३ या कृत्रिम उपग्रहासह अवकाशात झेप घेतली. या मोहिमेदरम्यान नऊ मिनीटामध्ये या प्रक्षेपकाने सुमारे १३० किलोमीटर उंची गाठली. यानतर तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली.
तिसऱ्या टप्प्यात उपग्रहाला यापेक्षाही उंचीवर नेण्यासाठी क्रायजेनिक इंजिन काम करत असते. मात्र या तिसऱ्या टप्पात काही सेकंदातच या इंजिनासह उपग्रह नियोजित मार्ग भरकटत असल्याचे लक्षात आले. तिसऱ्या स्टेजमध्ये मिशन फेल झाले.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या तीन दिवस आधी होणाऱ्या या उपग्रह प्रेक्षपणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. इस्रोसाठी हा एक मोठा झटका आहे. कालंच GSLV-F10 EOS-03 मिशनसाठी काऊंटडाऊन सुरु झालं होत.