पुणे – शहरात गुरुवारी कोवॅक्सिनचे सात केंद्रांवर डोस मिळणार असून, परंतु पुन्हा एकदा डोससंख्या कमी करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रांवर आता 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्रसंख्या मात्र सातच ठेवण्यात आली आहे.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बुधवारी कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. याशिवाय 15 जुलैपूर्वी कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना बुधवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. दरम्यान, सध्या कोविशिल्ड लसींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत.