ढाका – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज होत असलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे बांगलादेशने वस्त्रहरण केले आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत बांगलादेशने 4-1 असा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली व नव्या इतिहासाची नोंद केली.
बांगलादेशने प्रथमच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 मालिकेत विजय मिळवला आहे. सोमवारी अखेरच्या पाचव्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फालंदाजी करताना 8 बाद 122 धावाच केल्या होत्या. मात्र, या 122 धवांचा पाठलाग करतानाही ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. त्यांना 13.4 षटकांत केवळ 62 धावाच करता आल्या.
कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे तब्बल 9 फलंदाज 10 धावांचाही पल्ला पार करू शकले नाहीत.
बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 4 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज पाठोपाठ आता बांगलादेशविरुद्धचीही टी-20 मालिका गमावली आहे.