लंडन- शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिम स्वादुपिंड विकसित केले असून मधुमेही रुग्णांच्या राजतातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कृत्रिम स्वादुपिंड उपयुक्त ठरणार आहे. आणि सतत इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याचा त्रास कमी होणार आहे.
केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि स्वित्झर्लंडमध्ये युनिव्हर्सिटी हॉस्पिटल येथील संशोधक यावर संशोधन करत आहेत. संशोधकांच्या या पथकाचे प्रमुख डॉक्टर शेरलॉट बोकन यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये 26 रुग्णांवर सतत तेरा महिने संशोधन करण्यात आले. यापैकी 13 रुग्णांना कृत्रिम स्वादुपिंड बसवण्यात आले.
तरी इतर 13 जणांना इन्शुलिन थेरपी देण्यात आली ज्या रुग्णांना कृत्रिम स्वादुपिंड बसविण्यात आले होते त्यांचे रक्तातील साखर कमी होण्याची प्रक्रिया जलद आणि व्यवस्थित झाली होती. एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने , हे कृत्रिम स्वादुपिंड कार्यरत राहू शकते त्यासाठी रुग्णाला फक्त एका स्मार्टफोनची गरज आहे.
टाईप टू डायबिटीस असणाऱ्या रुग्णांवर या कृत्रिम स्वादुपिंडाचा उपयोग करण्यात आला आहे. आता ज्यांची किडनी व्यवस्थित कार्यरत आहे. आणि ज्यांना डायलिसिसची गरज नाही अशा रुग्णांवरही या स्वादुपिंडाचा प्रयोग लवकरच करण्यात येत आहे.