पुणे – मामाने भाच्यास मित्राचे दुकानातून हप्त्यावर माेबाईल फाेन विकत घेऊन दिला परंतु भाचा हप्ते भरत नसल्याने त्याबाबत जाब विचारणाऱ्या मामाचे दुकानदार मित्रास भाच्यासह त्याचे दाेन साथीदारांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राजशेखर विठ्ठल माेरे (वय-२२) यांनी हडपसर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आदित्य दणाने (रा.हडपसर,पुणे) व त्याचे दाेन साथीदार यांच्यावर याप्रकरणी पाेलीसांनी मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. आदित्य दणाने याचे मामाचे राजशेखर माेरे मित्र आहे.
आदित्य यास मामाने हप्त्यावर फाेन विकत घेऊन दिला हाेता, त्याचे हप्ता ताे भरत नसल्याने मामाने त्यास विचारणा केली असता सदर मामा-भाच्यात किरकाेळ वाद हाेऊन एकमेकांना मारहाणीचा प्रकार घडला. परंतु सदर भांडणाचा राग मनात धरुन आदित्यने त्याचे दाेन मित्रांसह राजशेखर माेरे यास हातात लाकडी दांडके व लाेखंडी धारदार हत्यार घेवून मारहाण केली.
या घटनेत माेरे यांच्या डाव्या पायाला जबर मारहाण हाेऊन ते जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाेलीसांनी सदर मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज जप्त केला असून अाराेपींचा शाेध सुरु केला आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पाेलीस करत आहे.