बदायू – 15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कार्यक्रमासाठी शहीद भगतसिंग यांच्या भूमिकेचा सराव करत असताना तालमीदरम्यान अचानाक फास घट्ट बसल्यामुळे 10 वर्षांचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये घडली आहे.
शिवम असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. शिवमच्या कुटुंबीयांनी हा अपघात असून यामध्ये कोणालाही दोषी न ठरवत कोणतीही तक्रार दाखल केली नाही.
शिवमसह अन्य् मुलांनी 15 ऑगस्टसाठी नाटकाचा सराव सुरू केला. शिवमने यामध्ये भगतसिंग यांची भूमिका साकरली होती. शिवमने स्टूलवर चढून फाशीचा दोर वर बांधला. त्याने मुलांना सांगितले की मी भगतसिंग यांच्यासारखा फासावर लटकेल. शिवमने गळ्यात दोर घालताच अचानक त्याच्या पायाखालून स्टूल सरकला आणि त्याच्या गळ्याभोवती फास बसला ज्यामुळे त्याचा जीव गुदमरला. शिवमला बघून मुलानी जोरजोरात आवाज केल्यानंतर लोकांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत शिवमचा मृत्यू झाला.