काबुल – अफगाणीस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यापासून विविध क्षेत्रातील समस्या वाढतच चालल्या आहे सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले आरोग्य क्षेत्रही विस्कळीत झाले असून एका ताज्या आकडेवारीप्रमाणे अफगाणिस्तानात आरोग्य व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे दररोज 167 लहान मुलांचा बळी जात आहे बिबीसी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे हा एक अधिकृत आकडा आहे.
अनधिकृत आकडा यापेक्षा जास्त असू शकतो देशातील घोर प्रांतातील बेस्ट हॉस्पिटलमध्ये सध्या अनेक लहान मुले दाखल करण्यात आली आहेत पण तेथे मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत एका बेडवर दोन मुलांना झोपावण्यात आले आहे साठ मुलांमागे एक नर्स उपलब्ध आहे डॉक्टर्सनी दिलेला माहितीप्रमाणे तालिबान राजवटीच्या धोरणामुळे महिला कर्मचारी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे परिचारिकांचे प्रमाण अतिशय कमी आहे.
अफगाणिस्तानमध्ये पूर्वीपासूनच आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत आहे अमेरिकेतील आणि जगाच्या इतर भागातील अनेक एनजीओच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सेवा पुरवण्यात येतात पण तालिबानी राजवटीच्या धोरणांमुळे एनजिओवर सुद्धा निर्बंध आल्यामुळे आरोग्य क्षेत्रात काम करणारे एनजीओचे प्रमाणही कमी झाले आहे याचा परिणाम म्हणून गेल्या 20 महिन्यांच्या कालावधीमध्ये अफगाणिस्तानातील अनेक रुग्णालय बंद पडली आहेत घोर हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर समदी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे देशातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर नाहीत याशिवाय काही मूलभूत यंत्रसामुग्री पण उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय चाचण्या घेणेही शक्य नाही महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने आरोग्य व्यवस्था चालवणेही अवघड होत आहे लहान मुलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या युनोच्या युनिसेफ या संघटनेने याची दखल घेऊन तालिबान राजवटीला योग्य सूचना द्याव्यात अशा प्रकारची मागणी आता पुढे येत आहे.