नागपूर – करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे संकेत असतानाच नागपुरात 12 दिवसांच्या बालकाचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या बाळाचा मृत्यू नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झाला आहे. दगावलेल्या मुलाचे कुटुंब मध्यप्रदेशमधील शिवनी येथील आहे.
बाळाच्या आईची प्रकृती नाजूक असल्याने बाळाला नागपूरला आणण्यात आले होते. महिलेची करोना चाचणी निगेटिव्ह होती, त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. 20 जूनला जन्मानंतर मुलाच्या हृदयात दोन छिद्र असल्याचे वैद्यकीय तपासणीत पुढे आले.
26 जूनला बाळाला ताप आला, त्यानंतर त्याचे नमुने चाचणीसाठी पाठवले. त्यात त्याला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचार सुरू असतानाच बाळाचा मृत्यू झाला. हृदयातील 2 छिद्रांमुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही.