पॅरिस – फ्रान्समधील युवापिढीला देशाच्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख करून देण्यासाठी स्वदेशीचा मंत्र जपण्याचे फ्रान्स सरकारने ठरवले असून या योजनेअंतर्गत 18 वर्षाखालील मुलांना 26 हजार रुपये देण्यात येणार असून या रुपयांचा वापर त्यांना स्थानिक वस्तू खरेदीसाठी करायचा आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत 18 वर्षाखालील तरुणांना जे 26 हजार रुपये देण्यात येणार आहेत ते त्यांना दोन वर्षात संपवायचे असून त्यासाठी एकच अट आहेत ती म्हणजे त्यांनी पुस्तके किंवा व्हिडिओ गेम याबाबत जी काही खरेदी केली असेल त्या वस्तू संपूर्ण स्वदेशी असाव्यात.
व्हिडीओ गेम तयार करणारी कंपनी फ्रान्सची असावी आणि पुस्तकेही फ्रान्समध्ये तयार झाली असावीत अशीही अट आहे. या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी कल्चरल पास नावाचे एक ×ऍप लॉन्च करण्यात आले आहे.
महामारीच्या काळात फ्रान्समधील युवा पिढीला देशाबाबत नव्याने ओळख होऊ लागली आहे. त्याचा आणखी फायदा करून घेण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमध्ये फ्रान्समधील 8000 संस्था आणि कंपन्या जोडण्यात आल्या असून या कंपन्यांच्या आधारे चित्रपट नाटक संगीत या बाबतची तिकिटे खरेदी करू शकतील.
देशांतर्गत उत्पादने आणि बाजाराला प्राधान्य देणाऱ्या वस्तूंची खरेदी ही या×ऍपच्या माध्यमातून करता येणे शक्य होणार आहे. फ्रान्स सरकारने हे ×ऍप लॉन्च केल्यानंतर 73 टक्के युवा वर्गाने पाठिंबा दिला. काही दिवसांमध्ये व्हिडिओ गेमचा खरेदी पेक्षाही पुस्तकांची खरेदी वाढल्याची गोष्टही यानिमित्ताने समोर आली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स ऑफ कल्चरने फ्रान्स सरकारच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे. युवा पिढी आता अनावश्यक खर्च टाळून योग्य खर्च करण्यास प्राधान्य देईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.