नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यानंतर भारतीय बाजारातही सोन्याचे दर त्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. दिल्ली दराबाद शुक्रवारी सोन्याचा दर 294 रुपयांनी वाढून 47,442 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र हा आधार चांदीला मिळू शकला नाही. वायदे बाजारात चांदीचे दर कमी झाल्यानंतर चांदीचा दर 170 रुपयाने कमी होऊन 66,274 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढवून 1831 डॉलर तर चांदीचा दर 25.57 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. या बाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीचे विश्लेषण तपन पटेल यांनी सांगितले की फेडरल रिझर्वच्या व्याजदर न वाढविण्याच्या निर्णयानंतर जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली.
यासंदर्भात मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की फेडरल रिझर्वच्या निर्णयानंतर डॉलरची विक्री वाढली. जगात आणखी करानाचे रुग्ण काही प्रमाणात वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी काही काळ व्याजदर कमी पातळीवर ठेवावे लागतील असे फेडरल रिझर्व्हने स्पष्ट केले आहे.