वाघोली – वाघोली चा समावेश पुणे महानगरपालिकेत झाला असून वाघोली साठी जास्तीत जास्त निधी आणून वाघोली चा कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार अशोक पवार यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते विकास सातव पाटील यांच्या येथील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम प्रसंगी ते पवार बोलत होते. यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, ह.भ. प. गुलाबराव सातव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य माणिकराव सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच कैलास सातव पाटील, माजी प्राचार्य बाळासाहेब सातव सर, किसन जाधव, विठ्ठल शिवरकर, बाळासाहेब शिंदे, अजिंक्य सातव, आकाश सातव पाटील, अभिषेक सातव पाटील, ओंकार सातव पाटील, अनिकेत सातव पाटील, शुभम सातव पाटील,संदीप सातव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.