दहशतीसाठी पिस्तूल बाळगणारा रिक्षा चालक अटक

पुणे- दत्तवाडी पोलिसांनी दांडेकर पुलावर एका रिक्षा चालकास पिस्तुलासह अटक केली. त्याच्या ताब्यातून पिस्तूल व दोन काडतूसे असा 40 हजार 400 रुपयांचा शस्त्रसाठा हस्तग्‌ करण्यात आला. त्याच्याविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्‍टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद वामन आल्हाट (37, रा . , दांडेकर पुल , दत्तवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
प्रेसनोट पोलीस गस्त घातल असताना, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अंमलदार अमित सुर्वे व अक्षयकुमार वाबळे यांना खबर मिळाली की , एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्टल घेवुन मागीरबाबा मंदिराजवळील टेम्पो स्टॅन्डमागे मित्राला भेटण्यासाठी थांबलेला असुन तो काहीतरी गंभीर अपराध करण्याची शक्‍यता आहे.

ही खबर मिळातच पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार व तपासपथक कर्मचारी यांनी सापळा रचुन आल्हाटला ताब्यात घेतले अंगझडीत त्याचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली. आल्हाट दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास असुन उदरनिर्वाहाकरिता रिक्षा चालवितो . दहशत निर्माण करण्याकरिता त्याने सदर पिस्टल बाळगल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पिस्टल त्याने कोठुन मिळविले व त्याचा यापुर्वी कोठे वापर केलेला आहे काय तसेच सदरचे पिस्टल त्याने स्वतःजवळ बाळगणेमागे त्याचा नक्की काय उद्देश होता याबाबत दत्तवाडी पोलीसांकडुन सखोल चौकशी सुरु आहे.

ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक स्वप्नील लोहार, हवालदार कुंदन शिंदे , सुधीर घोटकुले , पोलीस अंमलदार अमित सुर्वे, महेश गाढवे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर , अक्षयकुमार वाबळे , नवनाथ भोसले , सागर सुतकर, प्रमोद भोसले, शरद राऊत व विष्णु सुतार यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.