टोकियो – भारताची उदयोन्मुख महिला मुष्टियुद्ध खेळाडू लोवलिना बोरगोहेन हिने मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 64 ते 69 किलो वजन गटात तिने जर्मनीची अव्वल खेळाडू नादेन अपेझचा 3-2 असा पराभव केला.
लोवलिना ही आता पदकापासून केवळ एक विजय दूर आहे. तिने पुढील सामना जिंकल्यावर तिची उपांत्य फेरी निश्चित होणार असून तीचे ब्रॉंझपदकही निश्चित होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीचा सामना 30 जुलै रोजी होईल.लोवलिनाने संपूर्ण सामन्यात नादेनपेक्षा सरस कामगिरी केली.
पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये लोवलिनाने आक्रमक खेळ केला मात्र, तिसऱ्या फेरीत नादेनने चांगलीच लढत दिली. मात्र, लोवलिनाचा अनुभव जास्त सरस ठरला व तिने नादेनवर वर्चस्व राखताना विजय मिळवला. लोव्हलिनाचे कारकिर्दीतील हे पहिलेच ऑलिम्पिक आहे.