मुंबई – भाजपच्या आघाडीच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. पंकजा यांच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार उर्मिला मातोंडकर यांनी देखील पंकजा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
‘भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!’ असे ट्वीट उर्मिला मातोंडकर यांनी केले. त्यावर पंकजा मुंडे यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे.
‘धन्यवाद, फारच गोड. असं म्हणज पंकजां यांनी आपण भेटल पाहिजे अशी इच्छाही व्यक्त केली. त्यावर उर्मिला यांनी ‘कधीही, माझ्यासाठी आपली भेट आनंदाचीच गोष्ट आहे’ असं उत्तर दिलं.
. @BJP4India च्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! @Pankajamunde
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) July 26, 2021
अनेक दिग्गज नेत्यांचा या महिन्यात वाढदिवस साजरा झाला. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वाढदिवस झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या जन्मदिन आहे.