मुंबई – नुकतीच उर्मिला मातोंडकरबद्दल अशी एक बातमी समोर आली आहे, जी ऐकून सगळेच थक्क झाले. उर्मिलाचा पती मोहसिन अख्तरने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या मांडीवर एक मुलगी आहे. मुलीसोबतचा फोटो शेअर करून मोहसिनने तिला छोटी राजकुमारी म्हटले.
View this post on Instagram
मोहसीनची ही पोस्ट पाहून सर्वांनी सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली कारण त्याच्या चाहत्यांना वाटले की तो बाप झाला आहे. या कमेंट्स आणि मोहसिनची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यावर उर्मिलाने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली.
फोटो शेअर करत मोहसिनने लिहिले की, ‘वाह छोटी राजकुमारी, माझ्या हृदयाच्या राज्यावर तुझे राज्य होऊन पूर्ण 1 वर्ष झाले आहे. माझ्या लहान राजकुमारीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!’ असे लिहिले होते मात्र, सर्वजण अभिनंदन करत असल्याचे पाहून मोहसीनने पोस्ट एडिट करून ‘माझी सुंदर भाची आयरा’ असे लिहिले.
उर्मिला काय म्हणाली
आता उर्मिलाने टाईम्स ऑफ इंडियाशी याबाबत बोलताना सांगितले की, ‘आयरा माझी भाची आहे. आयरा ही त्याच्या भावाची मुलगी असल्याचेही मोहसीनने म्हटले आहे. जेव्हा त्याला मेसेज येऊ लागले, त्यानंतर त्याने कॅप्शनमध्ये ते दुरुस्त केले. उर्मिला आणि मोहसीनचे ३ मार्च २०१६ रोजी लग्न झाले होते. काही महिन्यांपूर्वी दोघांनी लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला होता.