मुंबई – प्रदीर्घ गॅपनंतर बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सौरभ वर्माच्या ‘तिवारी’ या आगामी वेब सीरिजमधून उर्मिला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.
३ ऑक्टोबरला या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला होता. अभिनेत्रीने स्वतः चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून मालिकेची घोषणा केली. पोस्टर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की उर्मिला मालिकेत पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये अॅक्शन करताना दिसणार आहे.
तिच्या डेब्यू वेब सीरिजची घोषणा करताना उर्मिलाने कॅप्शनमध्ये लिहिले,’तिवारी आणि डिजिटल डेब्यू या वेब सीरिजमधून माझ्या पुनरागमनाचा पहिला लूक शेअर करताना मी खूप उत्सुक आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. हे नेहमीपेक्षा अधिक आव्हानात्मक पुनरागमन करण्याचे वचन देते. आशा आहे की तुम्हा सर्वांना ही मालिका रोमांचक वाटेल. माझ्या नव्या प्रवासाच्या सुरुवातीसाठी तुम्हा सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छांची गरज आहे.’
आई-मुलाच्या नात्यावरील वेब सिरीज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्मिलाची ही मालिका आई आणि मुलीच्या भावनिक नात्यावर आधारित आहे. इतकंच नाही तर चित्रपटाची कथा एका छोट्या शहराची आहे, ज्यामध्ये तुम्हाला उर्मिलाची अॅक्शनही पाहायला मिळणार आहे.