औरंगाबाद : बिअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात; बॉक्स लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड

औरंगाबाद – बिअरच्या बाटल्या वाहून नेणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. ही घटना वैजापूर जवळील करंजगाव येथे हॉटेल ब्ल्यू मून जवळ घडली. अपघातात जीवीत हानी झाली नाही मात्र, कंटेनरमधील बिअरचे बाॅक्स लुटण्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गर्दी केली होती.

बिअरचे बाॅक्स घेऊन कंटेनर औरंगाबादहून मुंबईकडे जात होते. यावेळी वैजापूर जवळ ट्रकची धडक बसल्याने कंटेनरचा अपघात झाला. अपघातात कंटेनरचा एका बाजूचा पत्रा निघाल्याने कंटेनरमध्ये बिअर असल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या लक्षात येताच पोलिस कर्मचारी घटनास्थळावर दाखल होईपर्यंत अनेकांनी कंटेनरमधील बिअरच्या बाटल्या आणि बिअरचे बॉक्स पळवून नेले.

शेंद्रा एमआयडीसी उदयोग क्षेत्रातून कंटेनरमधून बिअरच्या बाटल्या मुंबईच्या कुर्ला भागाकडे नेल्या जात होत्या. बिअरच्या कंटनेरचा अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि अनेक जणांनी बिअरच्या बाटल्या ट्रकमधून घेऊन जाण्यास सुरुवात केली. ही घटना रविवार सायंकाळी 7.35 वाजेच्या दरम्यान घडली. साडेआठ वाजेपर्यंत या ट्रकमधील अनेक बिअरच्या बाटल्या नागरिकांनी पळवून नेल्या. पोलिस आल्यानंतर ही लूट थांबली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.