नाशिक – नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ५०० रुपयांच्या नोटांचे १० बंडल गायब झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नाही.
या परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही पाच लाख रुपये गेले कसे? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा गायब होण्यामागे घातपात किंवा मोठा घोटाळा असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
करन्सी नोट प्रशासन या प्रकाराची गोपनीय चौकशी केली आहे. प्रेस नोट प्रशासनाने अंतर्गत चौकशी करुनही पाच लाखांचा तपास लागला नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, कडेकोट बंदोबस्तात नोटछपाई सुरु असतानाही नोटा गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.