चंद्रपूर – चंद्रपूर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरालगत असलेल्या दूर्गापुर येथे जनरेटरमधील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता.
अजय लष्कर, वय २१, रमेश लष्कर, वय ४५, लखन लष्कर, वय १०, कृष्णा लष्कर, वय ८, पूजा लष्कर, वय१४, माधुरी लष्कर, वय २० अशी मृत्यांची नावे आहेत.
दरम्यान, डॉक्टर विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे सांगत आहे. एकूण सात जण बेशुद्ध झाले होते. त्यातील एक जिवंत आहे. या सातही जणांना सर्व प्रथम डॉक्टर विश्वास झाडे हॉस्पिट मध्ये उपचारार्थ दाखल केले होते. तिथेच डॉक्टरने सहा जणांना मृत घोषित केले आहे.