चंडीगढ – पंजाबचे माजी मंत्री अनिल जोशी यांची शनिवारी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. जोशी यांना काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रदेश शाखेने पक्षविरोधी कारवायांबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला जोशी यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
जोशी यांनी पक्षविरोधी भूमिका कायम ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे प्रदेश शाखेकडून सांगण्यात आले. अवघ्या सहा-तास महिन्यांवर पंजाब विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. अशात प्रदेश भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे जोशी यांच्यावरील कारवाईतून स्पष्ट झाले आहे. आता जोशी यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता आहे.