नवी दिल्ली- डॉलर कमकुवत होत असल्यामुळे जागतीक बाजारत सोन्याची खरेदी वाढून सोन्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे भारतातही सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 389 रुपयांनी वाढून 46,762 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 397 रुपयांनी वाढून 69,105 रुपये प्रती किलो या पातळीवर गेला.
जागतीक बोजारात सोन्याचा दर वाढून 1,106 डॉलर तर चांदीचा दर 26.63 डॉलर या पातळीवर गेला. याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरीटीजचे वरीष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर कमकुवत होत चालल्यामुळे व महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढून दरवाढ होत आहे.