मुंबई – जागतिक नेमबाजी क्रमवारीत 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनोबतने अव्वल स्थान पटकावले आहे.
जागतिक नेमबाजी स्पर्धेत केलेल्या अफलातून कामगिरीमुळे तिने हे यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत राहीने सुवर्णपदक पटकावले होते. ऑलिम्पिक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना 25 मीटर स्पोर्टस पिस्टल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारी राही जागतिक नेमबाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आल्याचे आयएसएसएफने जाहीर केले आहे.
सलग दोन वर्षे करोनामुळे वाया गेली होती. त्यानंतर अत्यंत अल्प सरावातही राहीने हे यश मिळवले आहे. ऑलिम्पिकमध्ये राही 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.