अंगावर सिगरेटे चटके ; मारहाणीत कान गमावला
पुणे :औंध परिसरात उच्चशिक्षीत सुनेचा शारिरिक, मानसिक आणि अमानुष छळ केल्याप्रकरणी पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात उद्योजक व कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा हुंडा प्रतिबंधक कायदा प्रमाणे दाखल करण्यात आला. याप्रकरणी 27 वर्षीय पिडीत विवाहीतेने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सासरच्या कुटूंबाने केलेल्या मारहाणीत विवाहितेला बहिरेपणा आला आहे. तर तीला अनेकदा पतीकडून सिगरेटचे चटके देण्यात येत होते. पती गणेश नानासाहेब गायकवाड (36) नानासाहेब शंकरराव गायकवाड ,नंदा नानासाहेब गायकवाड (तिघे रा.औंध, पुणे) सोनाली दिपक गवारे , दिपक निवृत्ती गवारे (दोघे रा. जेएम रोड, पुणे) दिपाली विरेंद्र पवार (रा. औंध, पुणे) भागीरथी पाटील (रा. औंध, पुणे , राजु अंकुश (सध्या रा. सांगवी, पुणे. मुळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत विवाहीता यांचा दि. 23 जानेवारी 2017 रोजी साखरपुडा झाला. त्यानंतर गणेश गायकवाड यांच्याशी पिडीत विवाहीतेचे लग्न झाले होते.तेव्हापासुन दागिने आणि हुंडयाच्या कारणावरून पिडीतेला सतत त्रास देण्यात येत होता. लग्नातील चांदीची भांडी व देवपुजेचे साहित्य, पिडीतेचा पासपोर्ट, डिग्री सर्टिफिकेट, पॅनकार्ड आणि इतर महत्वाची कागदपत्रे ही गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड यांनी पिडीतेला त्रास देण्याच्या उद्देशाने फसवणूक करून सुस गाव येथील फार्म हाऊसवर दडवून ठेवली आहेत असा आरोप पिडीतेने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे.
दरम्यान, पिडीतेने पती, सासु आणि सासऱ्यांनी वेळावेळी त्रास दिला असल्याचा आरोप केला आहे. तसेच इतरांनी देखील त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर पिडीतेच्या कानावर मारहाण झाल्याने पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे बहिरा झाला आहे. कान पुर्णपणे बहिरा झाल्याबाबत वैद्यकीय तपास करण्यात आली असून त्याला पोलिसांनी दुजोरा देखील दिलेला आहे.
पिडीत विवाहीतेच बीबीएपर्यंत शिक्षण पुर्ण झालेलं आहे. पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये प्रचंड धक्कादायक दरम्यान, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातदाखल असलेल्या या गुन्हयाबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गायकवाड कुटूंब हे औंध परिसरातील प्रतिष्ठीत कुटूंब आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. विवाहितेचा पती दारु पिऊन तीचा छळ करत होता. तीला बाथरुममध्ये सिगरेटचे चटकेही दिले आहेत. तीच्या जवळची महत्वाची कागदपत्रे काढून घेतली आहेत. तसेच मला तुझी गरज नाही, भरपूर ऍटम आहेत असे म्हणत तीचा मानसिक छळही केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर करत आहेत.