पुणे – किरकोळ वादातून डॉक्टर दाम्पत्याने ऐन ‘डॉक्टर डे’च्या दिवशी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना वानवडी येथे घडली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
डॉ.निखील शेंडकर (26) आणी पत्नी डॉ.अंकिता निखील शेंडकर(26) असे दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हे दाम्पत्य आझादनगर येथे रहाते. दोघांनीही बीएएमएसचे शिक्षण घेतले आहे.
निखील कासवती गावात प्रॅक्टीस करत होता. तर अंकिता देखील एका ठिकाणी प्रॅक्टीस करत होती. त्यांच्यामध्ये वाद होत होते. बुधवारी निखील घरी येत असताना त्यांचा फोनवर वाद झाला होता.
निखील घरी आल्यावर त्याने पाहिले असता, अंकिताने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर निखीलनेही नैराश्यातून घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनास्थळी वानवडी पोलीस तपसा करत आहेत.