पुणे : तलवार घेवून दहशत करुन गाडया फोडणाऱ्या आरोपीस अटक

भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी
पुणे :
तलावर घेऊन दहशत पसरवत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपी अटक करण्यात आली. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाने केली.

नवनाथ विठठल घाडगे (24, रा. आंबेगाव पठार, साईसिध्दी चौक) असे अटक आरोपीचे नाव आहे. भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे हददती तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे व पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, गणेश शेंडे व विक्रम सावंत यांना खबर मिळाली कि, चिंतामणी ज्ञानपीठ चौकात हातामध्ये तलवार घेवून एक व्यक्ती फिरत आहे. त्यांच्या हातामध्ये एक लोखंडी तलवार मिळुन आली ती जप्त करण्यात आली.

त्याच्याविरुध्द आर्म ऍक्‍टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने दि.26 जून रोजी आंबेगाव पठार येथे रस्त्यावरील दगड घेऊन इनोव्हा व हुडाई चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले होते. त्याबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होता. त्या गुन्हयामध्ये त्यास अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक, संगिता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, सर्फराज देशमुख,सचिन पवार, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड व सचिन गाडे यांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी नवनाथ व त्याच्या भावाची रहात्या सोसायटीच्या परिसरात भांडणे झाली होती. यावेळी त्याने भावावर दगडफेक केली. हे दगड लागून त्याच्या भावाच्या गाडीचे नुकसान झाले होते. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती.त्या अनुषंगाने तपास करत असतानाच आरोपी तलवार घेऊन दहशत पसरवत असल्याचे समजले. त्याने तलवार घेऊन स्टेटसही ठेवले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.