नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने-चांदीचे दर अस्थिर आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात सोन्याचा दर घसरला तर चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सोन्याचा दर 93 रुपयांनी कमी होऊन 46,283 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दिल्ली सराफात तयार चांदीचा दर गुरुवारी 99 रुपयांनी वाढून 66,789 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,780 डॉलर तर तयार चांदीचा दर 25.96 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. याबाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमाणी यांनी सांगितले की सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे डॉलरच्या भावाकडे लक्ष आहे.
डॉलरचा भाव सध्या अस्थिर आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या बाजारात सध्या अस्थिरता रेंगाळत आहे. आगामी काळात महागाई जास्त प्रमाणात वाढली तर सोन्याला आधार मिळू शकतो असे बऱ्याच विश्लेषकांनी सांगितले.