पिंपरी – लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे बुधवारी (दि. 23) बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1988 अन्वये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोविड 19 या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी, 2 फेब्रुवारीपासून आघाडीचे कर्मचारी, 1 मार्चपासून 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तसेच 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.
शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड 19 लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उद्या (दि.23) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवारी बंद राहणार आहेत.