बंगळूर – चेन्नई शहर पोलिसांनी एआयएडीएमकेचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना बंगळूरमधून अटक केली आहे. त्यांच्यावर मलेशियन महिलेवर बलात्कार, गर्भपात आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिल्यानंतर ते फरार होते, असे तामिळनाडू पोलिसांनी सांगितले.
मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी मनिकंदनची याचिका फेटाळली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या प्रकरणातील तपास सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका योग्य नाही, असे न्यायाधीश अब्दुल कुद्दोस यांनी म्हटले होते.
हे प्रकरण एका माजी मंत्र्याने केलेल्या कथित गुन्ह्याशी संबंधित आहे, जे गंभीर स्वरूपाचे आहे आणि तक्रार नोंदविण्यास योग्य आहे. याचिकाकर्त्याकडून माहिती गोळा करण्यासाठी ताब्यात घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे.
जामीन मंजूर झाल्यास, तो तपास टाळण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करू शकेल असे न्यायालयाने म्हटले आहे.
माणिकानंदन यांनी गर्भपात केल्याचा आरोप फेटाळण्या आधी त्या महिलेस ओळखण्यासही नकारही दिला होता.
या महिलेला ओळखत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर नंतर हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. तेव्हापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत होता. रविवारी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.