काही दिवसांपूर्वी शाहीद कपूर सुजॉय घोषसोबत काम करणार असल्याची बातमी होती. त्या चित्रपटाचे नाव काय आणि कधी सुरू होणार याची घोषणा करण्यात आली नव्हती.
मात्र, याबाबत आता लेटेस्ट न्यूज आहे. नाव जाहीर न झालेल्या या चित्रपटाची नायिका म्हणून तृप्ती दिमरीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याची चर्चा आहे.
बुलबुल फेम तृप्ती अचानक प्रकाशझोतात आली आहे. त्याचे कारण ती सुजॉय आणि शाहीदसोबत तर काम करतेच आहे.
मात्र, ती लवकरच रणबीर कपूरसोबत “ऍनिमल’ या चित्रपटातही झळकणार आहे. त्याशिवाय “काला’ या चित्रपटातूनही तिचे दर्शन होणार आहे. बाबील खान हा कालाचा नायक आहे.
बाबील हा दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा आहे. इरफान यांच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर तो चित्रपटसृष्टीत दाखल होतो आहे त्याची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे. त्यात त्याची नायिका होण्याची संधी तृप्तीला मिळाली आहे.
लागोपाठ तीन बडे आणि चाहते ज्यांची प्रतीक्षा करत आहेत किंवा करत असावेत असे चित्रपट तिला मिळाले असल्यामुळे तृप्तीचे लक सध्या जोरात आहे असे मानायला हरकत नाही.
शाहीदबाबत बोलायचे झाले तर त्याने नुकतेच “जर्सी’चे शूटिंग पूर्ण केले असून साउथच्या दोन दिग्दर्शकांसोबत तो आता आगामी दोन प्रोजेक्टवर काम करतो आहे.