शहनाझ गिलची चांगली ओळख झाली आहे. सलमानच्या बिग बॉसमध्ये ती स्पर्धक होती. बाकी काय झाले असेल नसेल, शहनाझचा तो एक संवाद क्या करू मैं….मर जाउ बराच हिट झाला होता. तो अजनुही सोशल मीडियावर बघायला आणि ऐकायला मिळतो. या एका संवादाने तिला अन्य स्पर्धकांच्या खूप पुढे नेउन सोडले.
View this post on Instagram
तिला पंजाबची कॅट्रीना कैफही म्हटले जाते. आता शहनाझने एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात ती गाणे म्हणताना दिसते आहे. आता गाणे म्हटले म्हणजे काय विशेष असा प्रश्न कोणीही विचारू शकतो. तर हे गाणे इंग्रजी आहे.
View this post on Instagram
त्यावर पुन्हा कोणी म्हणेल मग त्यात काय विशेष? तर त्यावर उत्तर असे की कलाकार मग ते कोणत्याही पडद्यावरचे असोत त्यांना इंग्रजी येतेच असे नाही. काही कलाकार आपल्याला इंग्रजी येत नसल्याचे न्यूनगंड न बाळगता स्वत:वरच व्यंग करून घेतात. त्यामुळे कलाकार म्हणजे त्याला इंग्रजी आलेच पाहिजे असे काही नाही.
View this post on Instagram
शहनाझने स्वत:च त्या व्हिडिओची सुरूवात अशी केली आहे की, कोणाचेही लक्ष वेधले जाते. कोण म्हणते मला इंग्रजी येत नाही. इंग्रजी ही कोणत्याही भाषेत इंग्रजीच असते, असा डायलॉग तिने टाकला आहे. तो खरेच गंमतीशीर आहे.
View this post on Instagram
त्यावर अर्थातच तिच्या चाहत्यांच्या कॉमेन्टस येत आहेत. त्यामुळे व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. अजुन प्रयत्न कर चांगले बोलता येईल वगैरे सल्लेही तिला देण्यात आले आहेत. दरम्यान, तिच्या आगामी प्रोजेक्टसबद्दल अजुन काही विशेष माहिती समोर आलेली नाही.