नोएडा – उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्धनगर फेज-२ भंगेल परिसरात एक महिलेचा बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती रात्री घरात येणार असल्यामुळे पत्नीने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. याच संधीचा फायदा घेत शेजाऱ्याने घरात धुसून महिलेवर बलात्कार केला आहे.
या प्रकरणी महिलेने तिच्या घराशेजारी राहत असलेल्या रिंकू नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेला जिल्हा रुग्णालयात नेऊन तिच्यावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, महिलेचा पती झोपण्यासाठी छतावर गेला होता. पती रात्री घरात येईल म्हणून महिलेने घराचा दरवाचा उघडा ठेवला होता. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या रिंकूने छतावरून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने गुपचूप महिलेच्या खोलीत घुसून तिला मारहाण केली. तसेच घाबरवून तिच्यावर बलात्कार केला.