दमा कशाने बळावतो हे जाणून घ्या

ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज स्टडीच्या अभ्यासानुसार, जागतिक स्तरावर सुमारे 334 दशलक्ष लोकांना दमा आहे. याचा रुग्णांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर आणि देशाच्या रचनेवर आणि अगदी शासनावर देखील फार भार आहे. याशिवाय रुग्णाच्या आयुष्यावर होणारा परिणाम हा वेगळा असतो.

दमा हा श्‍वसनमार्गाच्या क्षोभाचा एक आजार असून याची लक्षणे प्रत्येक रुग्णामध्ये काही प्रमाणात वेगळी असू शकतात. दम्याच्या जवळ जवळ सगळ्या बाबींमध्ये एक महत्त्वाची आणि समान अशी बाब म्हणजे दमा बळावण्याची कारणे- जेव्हा श्‍वसनमार्गाचा ऍलीर्जेन्सशी संपर्क येतो, तेव्हा त्यांचा क्षोभ होऊन, त्यावर सूज येते आणि त्यात श्‍लेष्मा जमा होते. यामुळे श्‍वसनमार्गाच्या प्रतिकारितेवर परिणाम होतो, आणि श्‍वसनास त्रास, खोकला आणि छातीत घरघर या सारख्या समस्या जाणवू लागतात.

दम्याचा संबंध हा दीर्घकालीन खोकल्याशी असतो, कारण शरीर आतील श्‍लेषमा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते, हे श्‍लेषमा श्‍वसनमार्गाच्या पृष्ठ भागावर जमा होऊन रुग्णास सतत अस्वस्थतेची भावना निर्माण करून देत असते. दम्याच्या मागील नक्की कारणे माहिती नसून, काही ऍलर्जी आणि कौटुंबिक इतिहास यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

तज्ज्ञांच्या मते दम्याच्या रुग्णांना किंवा दमा असलेल्या रुग्णाच्या व्यवस्थापनात मदत करणाऱ्यांना दमा नक्की कशाने बळावतो हे माहिती असणे आवश्‍यक आहे. यामुळे दीर्घकाळासाठी दम्यावर नियंत्रण मिळविता येते आणि दम्याच्या अटॅकची वारंवारीता देखील कमी करता येते.

पर्यावरणीय घटक, खाद्यपदार्थ, श्‍वसनामार्गे आत घेतले जाणारे ऍलर्जीक घटक माहिती असल्यास दम्याचा अटॅक येणे टाळता येऊ शकते. खाली दमा “बळावण्याची’ कारणे नमूद केली गेली आहेत:

पराग कण- हे झाडांमुळे निर्माण होणारे बारीक कण असतात, काही प्रकारची गवतं आणि पर्यावरणीय घटकांमध्ये ही आढळून येतात. पराग कणांपासून बचाव करायचा असल्यास एअर कंडिशनचा वापर करू शकता, विशेषता: शरद ऋतुमध्ये जेंव्हा हवेत भरपूर प्रमाणात पराग कण असतात. पराग कणांचे प्रमाण कास्ती असताना चेहऱ्यावर आवरण आणि नाकावर बाहेर जातान रुमाल, विशेषत: दुपारी फार महत्त्वाचे असते, झोपण्यापूर्वी डोकं धुणे फार महत्त्वाचे असते, (विशेषत: पराग कण वातावरणात जास्ती असतानाच्या काळात).

प्रदूषक आणि क्षोभ निर्माण करणारे घटक: हे घराच्या आत किंवा बाहेर दोन्हीकडे आढळू शकतात, आणि स्टोव्ह, आग, पर्फ्युम, स्वच्छतेसाठी वापरली जाणारी सामग्री आणि फवारे यांच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतात. नवीन बनविलेले फर्निचर, भिंती, छत यापासून देखील त्रास बळावू शकतो.
केसाळ प्राणी: उष्ण रक्त असलेले प्राणी, जसे कुत्रा, मांजर, पक्षी आणि उंदीर यांच्यामुळे देखील दमा बळावू शकतो. त्यांच्या त्वचेचे खवले, केस, पंख, वाळलेली थुंकी आणि मुत्री यामुळे दम्याचा ऍटॅक येऊन रुग्णास घरघर, खोकला आणि डोळ्यातून पाणी येण्यासारख्या समस्या उद्‌भवू शकतात.

ही बळावणारी कारणे बाजूला सारण्यासाठी केस आणि पंख असलेल्या प्राणी आणि पशुंपासून शक्‍य तेवढे लांब राहणे फार आवश्‍यक असते. इतर महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे, पाळीव प्राण्यांना आठवड्यातून एकदा अंघोळ घालावी, पाळीव प्राणी असलेल्या कुटुंबात किंवा मित्र परिवारात जाणे टाळावे आणि पंखांपासून बनविलेली उत्पादने वापरू नयेत.
धूम्रपानाचा धूर: यामुळे श्‍वसनमार्गास क्षोभ होतो आणि फुप्फुसांवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. जेव्हा धूम्रपानाचा धूर श्‍वसनामार्गे आत जातो, तेव्हा दम्याचा ऍटॅक बळावण्याची दाट शक्‍यता असते. या समस्येवर नियंत्रण मिळविण्याकरिता धूम्रपान टाळावे.

धूम्रपान अधिक होत असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे आणि घरात धूम्रपान करणारे कोणी असल्यास त्यांना ते सोडायला लावावे, किंवा घराबाहेर जाऊन धूम्रपान करावयास सांगावे. फवारा आणि सौंदर्य प्रसाधने: ओला रंग, एरोसोल स्प्रे आणि स्वच्छतेच्या सामग्रीमुळे दमा होऊ शकतो. अगदी पर्फ्युम्स आणि डियोड्रन्ट्‌स देखील दमा बळावतात. त्यामुऴे दमा रुग्णांनी नवीन रंग दिलेल्या ठिकाणी जाऊ नये. रंग व्यवस्थित वाळू द्यावा आणि नॉन- पर्फ्युम्ड स्वच्छतेची साधने वापरावीत. अती वास असलेले खाद्यपदार्थ बनवत असल्यास खिडक्‍या उघड्या टाकाव्या आणि एक्‍झॉस्ट लावावा.

फ व्यायाम: अती शारीरिक श्रमामुळे श्‍वास घेण्यास त्रास आणि फुप्फुसांवर ताण येणे स्वाभाविक आहे. यामुळे दमा बळावतो. शरीरासाठी व्यायाम उत्तम पर्याय आहे. यामुळे दमा बळावू शकतो. शरीरास व्यायाम जसा महत्त्वाचा आहे, तसे योग्य व्यायामाची पद्धती आणि चिकित्सकांना भेट देणेसुद्धा गरजेचे आहे.

जरी दमा पूर्णपणे बरा होऊ शकत नसला, तरी इन्हेलेशन थेरपीच्या माध्यमाने आणि वरती नमूद केलेल्या आजार बळावण्याची लक्षणे लांब ठेवल्यास, लक्षणांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते असे तज्ञ म्हणतात. इन्हेलेशन थेरपीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉईड असतात ज्यामुळे दम्याचे व्यवस्थापन केले जाते. याशिवाय तोंडाने घेतल्या जाणाऱ्या औषधअंच्या तुलनेत कॉर्टिकोस्टेरॉईड हे फार कमी प्रमाणात आवश्‍यक असतात जेणेकरून श्‍लेषमाची निर्मिती कमी होते आणि श्‍वसनमार्गावरील सूज कमी होते, ज्यामुळे श्‍वसनमार्ग अधिक संवेदनशील राहात नाही आणि म्हणून मग दम्याचा ऍटॅक येण्याची शक्‍यता देखील कमी होते.

दुर्दैवाने जागरूकतेच्या स्तरामध्ये आणि दम्याच्या उपचारासंदर्भात लोकांच्या मनात असलेल्या भावनेमुळे एक मोठी दरी निर्माण होते. इन्हेलेशन थेरपी हा उपचाराचा एक उत्तम पर्याय असूनसुद्धा किती तरी लोक त्यापासून लांब पळतात. मी असे बऱ्याच ठिकाणी बघितले आहे, की लग्न न झालेल्या मुलींचे पालक या उपचाराचा अवलंब करत नाही कारण आपल्या मुलीला दमा असल्याचे त्यांना सांगायचे नसते, कारण दमा असलेल्या मुलीचे लग्न होण्यास समस्या निर्माण होतात असा त्यांचा समज आहे.

त्यामुळे अशा उत्तम उपचार पद्धती दम्यासाठी उपलब्ध असताना, जुन्या समजुतींवर विश्‍वास ठेवू नका आणि आयुष्याचे सौंदर्य घालवू नका, आता वेळ आली आहे आयुष्याचे सौंदर्य बघण्याची आणि ती सुद्धा मोकळा श्‍वास घेतला होता.

डॉ. लक्ष्मीकांत गागेश्वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)