नागपूर- संगीतकार रामलक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. अखेर काल रात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत नागपूर येथे मालवली. राम लक्ष्मण यांच्या नावावर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठी, हिंदीत त्यांनी एकापेक्षा एक दमदार गाणी दिली. विजय यांचा जोडीदार गेल्यानंतर रामलक्ष्मण नावाने त्यांनी संगीत द्यायला सुरुवात केली होती. नंतर ते त्याच नावावे ओळखले जाऊ लागले.
‘पांडू हवालदार’, ‘आली अंगावर’, ‘राम राम गंगाराम’, ‘पथ्थर के फुल’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’.. ‘हमसे बढकर कौन’ आदी राम लक्ष्मण यांच्या नावावर तब्बल ९२ चित्रपट आहेत. विजय पाटील मुंबईत आल्यानंतर दादा कोंडके यांची एका कार्यक्रमात भेट झाली त्यावेळी पाटील व त्यांचे मित्र सुरेंद्र हेंद्रें यांना आपल्या आगामी सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. नंतर सुरेंद्र यांचे निधन झाले त्यांनतर दादांनी या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. त्यांनतर विजय पाटील राम-लक्ष्मण याच नावाने ओळखले जाऊ लागले.
राम-लक्ष्मण यांच्या निधनाची बामती कळताच अनेक कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे. आज शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.